Beed: ८० वर्षांच्या आजोबांनी केली गांजा लागवड; तुरीच्या शेतात गांजा लागवडीचा प्रताप..

आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे राहणाऱ्या ८० वर्षीय रामदास देवराव खरसे यांनी आपल्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात गांजा लागवड केली होती. याची गुप्त माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी या ठिकाणी धाड टाकली आणि त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या शेतातून तीन किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी, अंभोरा पोलिसांनी मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून वाहिरा येथील शेतात धाड टाकली. यावेळी त्यांना तुरीच्या पिकांमध्ये लपवून ठेवलेली तीन किलो वजनाची गांजाची झाडे सापडली. या झाडांची किंमत सुमारे ५७ हजार २०० रुपये होती.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतिश पैठणे, सुदाम पोकळे आणि मनोज खंडागळे यांच्यासह वाहन चालक पवार यांनी मिळून केली. आरोपीला अटक करून त्याला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. या प्रकरणी तहसीलदार वैशाली पाटील यांच्यावर महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

पत्रकार -

Translate »