काजीसांगवी विद्यालयात येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा

कै.एन.के. ठाकरे जनता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा !!
काजीसांगवीः- उत्तम आवारे पत्रकार : दि.६ डिसेंबर २०२४ रोजी जनता विद्यालयात महापरिनिर्वाण निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीम.वारके एस.डी.यांनी स्वीकारले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्ष,मविप्रसेवक संचालक निंबाळकर जे.एम. विद्यालयातील सर्वच ज्येष्ठ-श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी शालेय पंतप्रधान-उपपंतप्रधान यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थी मनोगत इ.१०वी चे विद्यार्थी कु.प्रणाली काळे,सिद्धार्थ कोल्हे यांनी व्यक्त करत डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.
शिक्षक मनोगतात जेष्ठ शिक्षक श्री कुंभार्डे एम.पी.यांनी महापरिनिर्वाण म्हणजे काय या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी सुरू केलेल्या चळवळी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह,नाशिक येथील काळाराम मंदिरातील सत्याग्रह,पुणे करार व भारतीय संविधान निर्मितीत त्यांचा असलेला सक्रिय सहभाग याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी या महामानवाकडून आदर्श घेण्याचे आवाहन केले.इ. ९वी च्या विद्यार्थिनी अदिती कोल्हे व श्रेया गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. अशाप्रकारे सर्व शालेय घटकांच्या सहकार्याने आनंद पूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुख्याध्यापक
जनता विद्यालय काजीसांगवी

पत्रकार -

Translate »