नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार
नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार
नाशिक, 24 डिसेंबर 2024 – नाशिक जिल्हा परिषदेची ग्रामसेवक भरती 2023 प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही, यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड चिंता आणि अस्वस्थता आहे.
ग्रामसेवक भरतीची परीक्षा पूर्ण होऊन गुणांची यादी जाहीर झाल्यानंतर विधानसभा आचारसंहितेपूर्वीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना तातडीने फोन करून दुसऱ्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले. मात्र, निवडणुका संपून महिना उलटून गेला तरीही अंतिम नियुक्त्या घोषित झाल्या नाहीत. यामुळे अनेक उमेदवारांच्या नोकरीच्या प्रतीक्षेला वेळेत पूर्णविराम मिळालेला नाही.
आज, 24 डिसेंबर 2024 रोजी, तात्पुरत्या निवड यादीतील काही उमेदवारांनी जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. मात्र, नियुक्त्या केव्हा मिळतील याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या विलंबामुळे उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेची अंतिम निवड यादी आणि नियुक्त्यांचा निर्णय लवकर होईल का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.