GST वाढीमुळे जुन्या गाड्यांची विक्री महाग? जाणून घ्या सविस्तर!

जुन्या गाड्यांवरील GST वाढ – जाणून घ्या सविस्तर नियमावली

जुन्या किंवा वापरलेल्या गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) आता 12% वरून 18% करण्यात आला आहे. हा बदल फक्त नोंदणीकृत विक्रेत्यांवर (Registered Dealers) लागू होणार असून, वैयक्तिक खरेदी-विक्रीसाठी हा कर लागू नाही.

GST कोणाला लागू होतो?

नोंदणीकृत विक्रेते (जसे की कार डीलर) जे गाड्या विकतात, त्यांना GST भरावा लागतो.

हा कर फक्त तेव्हाच लागू होतो, जेव्हा गाडी घसरलेल्या मूल्यापेक्षा (Depreciation Value) जास्त किंमतीत विकली जाते.

GST कोणाला लागू नाही?

जर एखाद्या व्यक्तीने आपली गाडी दुसऱ्या व्यक्तीला खाजगी स्वरूपात विकली, तर GST लागू होत नाही.

जर गाडी विक्री घसरलेल्या मूल्यापेक्षा कमी किमतीत झाली, तर GST भरावा लागणार नाही.

GST फक्त नफ्यावर लागू – उदाहरण समजून घ्या:

खरेदी किंमत: ₹18 लाख

घसरलेले मूल्य: ₹12 लाख

विक्री किंमत: ₹15 लाख

नफा: ₹3 लाख

GST: ₹54,000 (18% नफ्यावर).

कार मालकांसाठी याचा काय परिणाम होऊ शकतो?

वाढलेल्या GST दरामुळे गाड्यांचे व्यवहार महाग होण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांना या बदलाचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल, जो पुढे ग्राहकांवरही येऊ शकतो.

तुमच्या मते वापरलेल्या गाड्यांवरील GST दर वाढ योग्य आहे का? तुमचे मत krushinews.com वर जरूर शेअर करा!

पत्रकार -

Translate »