दिघवद विद्यालयात युवा महोत्सव साजरा.

दिघवद विद्यालयात युवा महोत्सव साजरा.
दिघवद वार्ताहर -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये मनोरंजनात्मक खेळ,मैदानी खेळ,वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या युवा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव दिला.मैदानी खेळातुन अनेक खेळाचे कसब दाखविले. वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, शेतकरी माझा बाप, आजचा युवक दशा आणि दिशा इत्यादी विषयावर आपले वकृत्व सादर केले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय तसेच महाराष्ट्रीयन कला संस्कृती जोपासणारे अनेक कार्यक्रम सादर केले. शिवजन्मोत्सवाचा पाळणा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून आपल्यातील कला गुण जोपासले. युवा महोत्सवातील या कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी संस्थेचे तसेच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये नाशिक शिक्षक सोसायटीचे माजी कार्यवाह जीभाऊ शिंदे माजी उपाध्यक्ष तसेच विद्यमान संचालक ज्ञानेश्वर ठाकरे,संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे,संस्थेचे माजी चिटणीस पोपटराव गांगुर्डे,माजी उपाध्यक्ष गंगाधर गांगुर्डे,शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे,खजिनदार विठ्ठल गांगुर्डे,शिक्षक संचालक सदाशिव गांगुर्डे,नानाभाऊ गांगुर्डे,बनुबाई गागरे,माजी सरपंच उत्तमराव झाल्टे,बबन गाडे,पत्रकार कैलास सोनवणे तसेच परिसरातील आदींनी युवा महोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .या युवा महोत्सवासाठी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,किशोर गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे,शशिकांत पाटील, सुनील गांगुर्डे,संदीप पाटील,प्रभाकर पेंढारी,सुनील चंदनशिव,अमोल ठोंबरे,गणेश गांगुर्डे,धनंजय गांगुर्डे,सागर गांगुर्डे, शुभम हांडगे,मधुकर गोसावी,साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे,रेणुका कानडे,सुनिता राठोड, हर्षाली भामरे,कलुबाई साबळे,रमा नगराळे, जयश्री पाटील आदींनी परिश्रम घेतले.

तांत्रिकाचे मंत्र बिघडवतील जीवनाचे तंत्र” अर्थात अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेतील काही क्षणचित्रे…..

पत्रकार -

Translate »