प्रयाग महाकुंभ जलाचे चांदवड तालुक्यात आगमन – भाविकांसाठी दर्शनाची सुवर्णसंधी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या समरसता महाकुंभ अंतर्गत प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभातील पवित्र जलाचे चांदवड तालुक्यात आगमन झाले आहे.
या पवित्र जलाचे खडक, ओझर, शेलुपुरी, वाकी, वडाळीभोई, दहिवद, भायाळे, कानमंडाळे, दिघवद आणि गोहरण या गावांमध्ये मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात येत आहे.
चांदवड येथे आलेल्या कलशाचे विधीवत पूजन महामंडलेश्वर 1008 शांतिगिरी महाराज, ह. भ. प. सुजित महाराज आणि नामदेव महाराज गांगुर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गावागावांमध्ये शेकडो भक्तांनी दर्शन आणि पूजनाचा लाभ घेतला.
144 वर्षांनंतर महाकुंभ पार पडला असल्याने अनेक भाविकांना प्रयागराज येथे जाता आले नाही. त्यामुळे या पवित्र कुंभ जलाचे दर्शन मिळावे म्हणून तालुक्यातील विविध गावांमध्ये जलयात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती ह. भ. प. अर्जुन महाराज गांगुर्डे यांनी दिली.
तालुक्यातील ह. भ. प. सोपान महाराज बोरगुडे हे विशेष परिश्रम घेत असून त्यांनी भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
गावातील ग्रामस्थांनी या पवित्र कुंभ जलाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




