लाच प्रकरण: सटाणा तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी रंगेहात सापडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) नाशिक: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात २५,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून कारवाई केली.
आरोपींची नावे:
1️⃣ योगेश ज्ञानेश्वर जाधव – तलाठी, ठेंगोडा, ता. सटाणा, जि. नाशिक
2️⃣ संजय गंगाधर साळी – मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, सटाणा
लाच मागणी व कारवाई:
तक्रारदाराच्या मुलाने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याने २५,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक (ACB Nashik) येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. १६ डिसेंबर २०२४ रोजी आरोपींनी तडजोड करून १५,००० रुपयांवर लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, ACB पथकाने रंगेहात कारवाई करत गुन्हा दाखल केला.
गुन्हा नोंदविण्यात आलेले कलम:
- भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७(A), १२ अन्वये गुन्हा दाखल
कारवाई करणारे अधिकारी:
✅ सापळा अधिकारी: अनिल बडगुजर, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
📞 संपर्क: 8999962057
✅ मार्गदर्शक अधिकारी:
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र
📞 संपर्क: 9371957391 / 7588947623
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
आपल्या सहकार्यानेच भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होईल!
