‘मराठा मंच’कडून ”शिवगौरव :२०२५” या पुरस्काराणे खंडू आहेर सन्मानित.

काजीसांगवीः उत्तम आवारे : सामजिक क्षेत्रातील विविध प्रकाचे योगदान देणाऱ्या व समजत मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा पाच व्यक्तीचा मराठा मंच या सामजिक संघटनेच्या वतीने मागील बारा वर्षापासून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सन्मान केला जातो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध
शिवगौरव पुरस्कारासाठी राजमाता जिजाऊ चरित्र , शिवचरित्र,सन्माचिन्ह, सन्मापत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असते.
खंडू आहेर व यांच्या सोबत च्या टीम ने सकल मराठा परिवार फाउंडेशन च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे केली यात प्रत्येक वर्षी दिवाळीच्या अगोदर किल्यावर दीपोत्सव साजरा करणे. सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून मेळावा घेने.सीमेवरील सैनिकांना राखी पाठवने .मतदान जनजागृती मोहीम राबवणे.वृक्षारोपण कार्यक्रम घेणे.गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा. १० वी १२ साठी करिअर मार्गदर्शन शिबिरे घेणे.सकल मराठा परीवार मेडिकल टीम च्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेणे .मागील एक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात ५१८९ रक्त पिशवी संकलन केले तर ३९२ रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले.रायगड ,पन्हाळा,शिवनेरी, सालेर या ठिकाणी गडकोट साफसफाई मोहीम.असे अनेक समाजोपयोगी काम केल्याने मराठा मंच या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री महेश दळे,नगरसेवक अरुण पवार,चांदवड चे प्रांत अधिकारी कैलास कडलग v मराठा मंच चे अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण
यांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश कड सर यांनी केले.
याप्रसंगी जोपूळचे हवामान तज्ज्ञ श्री दीपक शिंदे.नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयुर पाटील मराठा मंच तसेच सकल मराठा परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते.


