कैलास सोनवणे (दिघवपत्रकार), ता. चांदवड:
सालाबादप्रमाणे यंदाही दिघवद गावातून दिघवद ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून.

या वेळी शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्र शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते दिंडीत सहभागी होत असलेल्या भाविकांना टी-शर्ट सप्रेम भेट देण्यात आले.

गावातून साईनामाचा जयघोष करत दिंडीचे प्रस्थान झाले असून, ही दिंडी काजी सांगवी, तळेगाव, पाटोदा, येवला, कोपरगाव मार्गे शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.

दिंडीचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले असून, साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिघवद साईबाबा तरुण मित्र मंडळाने केले आहे.


पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »