ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ, चांदवड येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा_रॅली काढण्यात आली

उत्तम आवारे चांदवड: ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ, चांदवड येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा_रॅली काढण्यात आली.

जम्मू कश्मीर मधील #पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून #ऑपरेशन_सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.

यावेळी सर्व समस्त राष्ट्रभक्त चांदवडकर तसेच सर्व पक्षीय तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »