भव्य अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर संपन्न – पाथरशेंबे येथे ९५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दि. १ मे २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत पाथरशेंबे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था, चांदवड यांच्या वतीने आयोजित भव्य अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले. ५ ते १६ वयोगटातील सुमारे ९५ विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांना श्रीहरिपाठ, श्रीमद् भगवद्गीता विचार, कीर्तन, मृदंग/तबला प्रशिक्षण, वारकरी भजन, तसेच स्वावलंबी व शिस्तप्रिय जीवनशैली, ध्यान, योगासने, संत व शुरवीरांचे चरित्र, देव-देश-धर्माची ओळख, आणि विविध खेळ अशा विविध उपक्रमांतून अध्यात्मिक व संस्कारक्षम शिक्षण देण्यात आले.
शिबिराची सांगता ह.भ.प. दौलत महाराज ठोंबरे यांच्या प्रेरणादायी काल्याच्या कीर्तनाने झाली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात सुभाष साठे, डि. के. साठे, प्रकाश पेंढारकर, इंजि. मंगेश शेळके, तसेच जय मल्हार भक्त मंडळ व सौ. मंदाकिनी विष्णु शिंदे (आजी) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिराचे मार्गदर्शन संस्थापक ह.भ.प. अर्जुन महाराज गांगुर्डे दिघवदकर व सहशिक्षक ह.भ.प. राजेंद्र महाराज पठाडे यांनी अखंडपणे केले. हे दोघेही शिबिराच्या सर्व दिवशी विद्यार्थ्यांच्या समवेत उपस्थित राहून त्यांचे मार्गदर्शन करत होते.
हे शिबिर सर्वांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.
