चांदवड लासलगाव हवे रोड वर पडले खड्डे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) विंचूर प्रकाशा महामार्गावर चांदवड ते लासलगाव च्या मधे हिवरखेडे , दिघवद दहिवद कोलटेकफाटा वाळकेवाडी या भागातील रोडवर ठिक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असुन पावसाने लहान खडे मोठाले झाले आहेत चांदवड लासलगाव हा गुजरात जाण्यासाठी जवळचा असल्याने व येवला मनमाड चांदवड ह्या मार्गाने लांबचा आहेत त्या मुळे लासलगाव दिघवद मार्गाने लहान मोठे वहानांची वर्दळ जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे मोठाले खड्डे पडल्याने मोठे वहान भरलेले असल्याने खडयांत गेल्यावर पाठिमागुन येणारे वहान समोरच्या खडयातिल वहानावर धडकले जाते तसेच पावसामुळे खडे पाण्याने भरल्यानंतर वहान धारकांना खड्डे किती खोल व मोठे आहे हे कळत नसल्याने छोटे मोठे लहानाचे चाके निखाळण्याची भिती वहान धारकांनी व्यक्त केली आहे तरी संबंधित विभागाने जागोजागी पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी वहान धारकांनी केली आहे.
