शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये मुलांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय करण्यासाठी शाळांसोबत शासकीय स्तरावरून सुद्धा प्रयत्न करण्यात आले. शासनाचे अनेक विभागातील शासकीय कर्मचारी निरीक्षण कामी शाळेमध्ये उपस्थित होते. पहिल्याच दिवशी100%विद्यार्थी उपस्थिती रहावे यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
आवडते मज मनापासुनी शाळा! लावीती लळा जशी माऊली बाळा! ह्या उक्ती प्रमाणे शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. विद्यार्थ्यांची जडणघडण, त्याच्या ज्ञानाची पायाभरणी शाळेतच होत असते. त्यामुळे शाळेतील पहिला दिवस हा विद्यार्थ्यां साठी अतिशय महत्त्वाचा असतो. मुलांना शाळेविषयी लळा निर्माण व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी अनेक शाळांनी वेगवेगळे उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबविले. शाळा,शाळेतील शिक्षक, शाळेतील वातावरण याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल असते शाळेविषयी भीतीही त्याच्या मनामध्ये असते. शाळेविषयी असणारी भीती दूर करून अतिशय मनमोकळ्या आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेमध्ये झाला पाहिजे त्याच्या मनामध्ये शाळेविषयी कुठल्याही प्रकारची भीती असता कामा नये यासाठी अनेक शाळानी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा केला.त्यामध्ये विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.फुले देऊन,फेटे बांधून,वृक्षारोपण करून, पायांचे ठसे घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यामध्ये दिघवद, काजीसागवी, उर्धुळ,बोपाने, सोनिसांगवी, कोलटेक, दरसवाडी, धनगरमाडी, हिवरखेडे या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा केला. यामध्ये दिघवद प्राथमिकव माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करताना ट्रॅक्टरची सजावट करून त्यामधून नवोदित विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्याचबरोबर शाळेने एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला त्यामध्ये नवोदित विद्यार्थ्यांना झाडांची रोपटे देऊन शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जेणेकरून या झाडांच्या संवर्धनातून आणि संगोपनातून विद्यार्थ्यांची नाळ शाळेबरोबर जोडली जाईल. शाळेबरोबर भावनिक नाते जोडून जिव्हाळा निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये हा दिवस कायमस्वरूपी आठवणीत राहील. ह्या प्रवेशोत्सवा निरीक्षण कामी शासकीय स्तरावरील अधिकारी वर्ग माधुरी वाडिले उप अभियंता पाणीपुरवठा विभाग चांदवड, वासंती बोरसे सहाय्यक सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग चांदवड संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ शाळा समितीचे अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे संस्थेचे संचालक नानासाहेब गांगुर्डे पालक ह भ प रमेश महाराज,सुभाष साठे, गणेश गांगुर्डे,किशोर गांगुर्डे, एकनाथ गांगुर्डे,कुलकर्णी गुरु तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.गांगुर्डे, पर्यवेक्षक के.पी.गांगुर्डे,जेष्ठ शिक्षक अर्जुन गांगुर्डे,शशिकांत पाटील, उपशिक्षक सुनील चंदनशिव,प्रभाकर पेंढारी, सुनील गांगुर्डे, अमोल ठोंबरे, संदीप पाटील, गणेश गांगुर्डे शिक्षिका कलुबाई साबळे, सुनीता राठोड, रेणुका कानडे, जयश्री भामरे, रमा नागरारे, शिक्षकेतर कर्मचारी धनंजय गांगुर्डे, सागर गांगुर्डे साहेबराव घोलप व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




