आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यातर्फे चांदवड तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)आषाढी वारीसाठी चांदवड व देवळा मतदारसंघातून पाच ते सहा दिवसांपूर्वी वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले वारकरी भिजण्यापूर्वी वार करणार रेनकोट मिळाले पंढरपूर जाणाऱ्या चावट तालुक्यातील वारकऱ्यांना ११०० रेनकोट वाटप करण्यात आले दरवर्षी पंढरपूरचा वारीसाठी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे धाव घेत असतात परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत असतो त्यामुळे वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते या वारी सहभागी होणारे बहुतांश वारकरी शेतकरी कामगार तसेच मजूर वर्गातील असतात त्यामुळे पाऊस वारकऱ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी छत्री किंवा रेनकोट गरजेचे असते त्यामुळे या वर्षी आमदार डॉ.राहुल आहेर यांनी वारकऱ्यांना रेनकोट दिले.
मागील वर्षापासून चांदवड तालुक्यातील वारकऱ्यांसाठी आमदार डॉ.राहुल आहेर यांनी हा उपक्रम सुरू केला असून, मागील वर्षी देखील मतदारसंघातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले होते यामध्ये तेराशे वारकऱ्यांना रेनकोट केले होते.
यावेळी पाथरशेंबे, मतेवाडी, कानमंडाळे, वडाळीभोई, विजयनगर(धोंडाबे) व देवळा तालुक्यातील दहीवड येथील दिंड्याना रेनकोट वाटप करण्यात आले.

हजारो वारकरी पंढरपूर दाखल होणार आहेत वाटप करताना वारकऱ्यांसोबत
विठ्ठलाचा जयघोषात, हरिनामाचा गजर, तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या तालावर आणि भक्तिरसात न्हाऊन वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं मार्गस्थ झाले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष श्री.संदीप काळे, ह.भ.प.युवा कीर्तनकार श्री.सौरभ महाराज जाधव,मा. सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.दीपक उशीर, श्री.वाल्मिक पवार, श्री.मनोज किरकाडे, श्री.मुकेश आहेर, श्री.मुकुंद बोरसे, श्री.राहुल हंडगे, श्री.संतोष क्षत्रिय,श्री.विठ्ठल आवारे, श्री.मिलिंद खरे, श्री.अंकुश ठाकरे यावेळी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »