सिद्धिविनायक अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी


काजीसांगवीः उत्तम आवारे
मान्यवरांचा हस्ते बक्षिसांचे वितरण

सिद्धिविनायक कॉम्प्युटर आयोजित
प्रोएक्टीव्ह अबॅकस नॅशनल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल लासलगाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सिद्धिविनायक अबॅकस क्लासचे १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विराज सांगळे या विद्यार्थ्याने चार मिनिटात शंभर गणिते अगदी बरोबर सोडविल्याबद्दल सायकलचा मानकरी ठरला. तसेच नाशिक येथे झालेल्या उन्हाळी स्पर्धांमध्ये ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, त्यामध्ये २७ विद्यार्थी विजयी झाले.सिद्धिविनायक कॉम्प्युटर सेंटरला बेस्ट सेंटर पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहा मिनिटात १०० गणिते सोडवीली.

या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचा पालक व मान्यवरांचा उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. " ज्या विषयाची आपणास भीती वाटते अशा विषयाशी आपण मैत्री करावी तसेच गणित हा विषय अबॅकस च्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने शिकविला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे. आपल्या मनोगतातून लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिमुकल्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद असून, त्यांचे गणिताप्रती असलेले आवड त्यांना जीवनात निश्चितच मोठे यश मिळवून देईल.अशीच एकाग्रता ठेवून अभ्यास करावा. असे प्रतिपादन कृषी तज्ञ व लेखक सचिन होळकर यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाकडेही पालकांनी व शैक्षणिक संस्थांनी लक्ष दिले पाहिजे. शरीर सुदृढ असेल तर सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादित करता येईल असा आशावाद पंचायत समिती माजी सभापती शिवा पाटील सुरवसे यांनी व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांचा सिद्धिविनायक कॉम्प्युटरचे संचालक योगेश गलांडे व संचालिका कांचन गलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच योगिता पाटील, लासलगाव बाजार समिती माजी सभापती सुवर्णाताई जगताप, पंचायत समिती माजी सभापती शिवा सुरासे पाटील, पीएसआय पवन सुपनर,लासलगाव खरेदी विक्री संघ चेअरमन शंतनु पाटील, शेतीतज्ञ व लेखक सचिन होळकर, थेटाळे ग्रामपंचायत सरपंच शितल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, केशवराव जाधव, भारत माता संस्थेचे अध्यक्ष शरद लोहकरे,रूपा केदारे, सीमाताई दरेकर, शैलजा भावसार आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मनीषा लोहकरे यांनी केले. प्रास्ताविक योगेश गलांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक कम्प्युटरच्या संचालिका कांचन गलांडे, आरती कानडे, श्रुती कुलकर्णी, शैलेश गाढे, सचिन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

पत्रकार -

Translate »