राष्ट्रीय पक्षी मोराचा रेल्वे धडकेत दुर्दैवी मृत्यू – प्राणिमित्र, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा संवेदनशील हस्तक्षेप

राष्ट्रीय पक्षी मोराचा रेल्वे धडकेत दुर्दैवी मृत्यू – प्राणिमित्र, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा संवेदनशील हस्तक्षेप

मनमाड (प्रतिनिधी भागवत झाल्टे) –
आज दिनांक १ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास मनमाड नगर चौकीजवळील गेट क्रमांक ८२ येथे एक दुर्दैवी घटना घडली. हुबळी वरून येणाऱ्या मुजफ्फरनगर एक्सप्रेस गाडीच्या धडकेने भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा मृत्यू झाला.

घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक बंद होता आणि अनेक वाहनचालक व स्थानिक नागरिक रस्त्यावर थांबले होते. याच दरम्यान, जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून उडत आलेल्या एका मोठ्या मोराला धावत्या ट्रेनने जोरदार धडक दिली. गाडी काही क्षणासाठी गेटजवळ स्लो झाली होती. धडकेनंतर मोर वरती लटकताना दिसून आला आणि काही क्षणांतच खाली पडला.

घटनेचे साक्षीदार असलेले संजय दराडे (शिवसेना उपशहरप्रमुख, मनमाड), रमेश काकड, बापू भाऊ दराडे, रमेश जाधव, संजय भाऊ राऊत हे गावकरी आणि परिसरातील काही नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मोराला रेल्वे पटरीवरून बाजूला नेले. त्यावेळी मोर गंभीर जखमी स्थितीत होता. उपस्थितांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वन्य पशु प्राणि मित्र युवा क्रांती फाउंडेशन माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री भागवत झाल्टे यांनी त्वरीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अवघ्या १० मिनिटांत फॉरेस्ट ऑफिसचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनरक्षक सोनाली वाघ आणि वन कर्मचारी अंकुश गुंजाळ यांनी घटनास्थळी हजर राहून मृत मोराची पाहणी केली आणि पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर कार्यवाहीसाठी मोर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याचे संरक्षण करणे ही आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. यासारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.


उपस्थित प्रत्यक्षदर्शी:

संजय दराडे – उपशहर प्रमुख, शिवसेना

रमेश काकड – स्थानिक ग्रामस्थ

समाजसेवक बापू भाऊ दराडे – स्थानिक

रमेश जाधव

संजय भाऊ राऊत

सूचना व समन्वय:

वन्य पशु प्राणी मित्र श्री भागवत झाल्टे

मोर ताब्यात घेतले:

वनरक्षक सोनाली वाघ

वन कर्मचारी अंकुश गुंजाळ


निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे हीच खरी देशसेवा.

पत्रकार -

Translate »