कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : चांदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून चालणार्या पावसाने पेरणी व लागवड केलेल्या पिके पावसाने खराब झाली असून काही भागात टोमॅटो व वांगी मिरची कोबी फ्लॉवर आदी पिकांवर करपा व टोमॅटो पिकावर काळा ठिपका पडला असुन सर्व प्रकारच्या मिरची पिकाचे बुरशी जन्य रोगाने मुळे खराब झाली असून घुबडा व आदि रोगांनी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मका पिका बरोबरच सर्व पिकांवर महागडे औषधे शेतकरी करतांना दिसत आहे टोमॅटो पिकावर सुर्य प्रकाश जास्त प्रमाणात पडला तरी पावसाने विश्रांती घेतली तरच काही प्रमाणात टोमॅटो वाचतिल अशे चांदवड तालुक्यातील उत्तर भागातील मनोहर पवार यांनी सांगितले तालुक्यात सर्वच भागात पिकांची उत्पादकता कमी प्रमाणात दिसून येते आहे उत्पादन वाढीसाठी शेतकरी महागडेखत व औषध मारत आहे ढगाळ वातावरणामुळे व येणाऱ्या पावसामुळे पिकांची कुज कोबी फ्लॉवर पिकांवर करपा रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता दिघवद येथिल शेतकरी कैलास पगार यांनी सांगितले खराब वातावरणामुळे सर्वच पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »