कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :-

साश्रु नयनांनी मानस कन्येला निरोप

दिघवद वार्ताहर :- उर्धुळ येथे गेली 16 वर्ष कार्यरत असलेल्या ग्रामसेवक श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई यांची श्रीरामनगर ता. निफाड येथे बदली झाली,गेली 16 वर्ष श्रीमती देसाई यांनी विकास कामाचा सपाटा लावला होता त्याला कुठे तरी खंड पडल्याची खंत गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली,अतिशय कार्यकुशल, मनमिळाऊ, कुठलाही निर्णय धडाडीने घेण्याची क्षमता असलेली अधिकारी अशी त्यांची ओळख होती,त्यांच्यात असलेली कामाबद्दलची तळमळ ,स्वतःला कामात अहोरात्र झोकून देण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी होती, त्यांच्यात धाडसी निर्णय घेण्याच कसब अतुलनीय होत, लहान थोरांशी मनमोकळे पणाने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याच्या त्यांच्या स्वभावा मुळे सर्वांच्या गळ्यातील त्या ताईत बनल्यात,हळूहळू गावाच्या मानस कन्या बनल्यात,प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केले, त्यांच्या काळात सन 2017/18 पाणी फाउंडेशन अंतर्गत उर्धुळ गावाला उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले, सन 2019/20 ला कोरोना सारख्या महामारी वर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवलं,सन 2023/24 संत गाडगे बाबा पुरस्कार,सन 2024/25 आर आर आबा सुंदर गाव पुरस्कार,हागणदारीमुक्त गाव,जलयुक्त शिवार,ओला/सुखा कचरा संकलन व व्यवस्थापन ,स्मशानभूमी विकास,44 गाव पाणीपुरवठा योजना,भूमिगत गटार,रो ह यो अंतर्गत मोठ्या प्रमाणांत वृक्ष लागवड, ग्रामपंचायतला I S O मानांकन, अंगणवाडी इमारती आणि टंचाई वर मात करण्यासाठी विशेष उपाययोजना म्हणून अमृतसरोवर(गावतळे) तसेच,पर्यावरण संवर्धनासाठी ऑक्सिजन पार्क तयार केले,गावाला शुद्ध पाणीपुरवठा करणेकमी जलशुद्धीकरण यंत्र (RO), गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून cctv बसविण्यात आले,गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान,बचतगटाच्या महिलांना लघुउद्योग करणेसाठी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले, अजूनही काही दैदीप्यमान कामगिरी करून प्रशासनास गावाची दखल घेण्यास भाग पाडले अशा ह्या कार्यसम्राट अधिकाऱ्यांचे कौतुक होणे क्रमप्राप्त होते त्या साठी ग्रामस्थांनी शनिवार दिनांक 12/7/2025 रोजी भव्यदिव्य असा निरोप समारंभ आयोजित करून गाव च्या लेकीला अत्यंत भावुक वातावरणात निरोप दिला,त्याप्रसंगी अबाल वृद्धांच्या पण डोळ्यातुन अश्रू वाहत होते,वारंवार त्यांना विचारणा करत होते की आता तुम्ही परत कधी याल, त्यावेळी श्रीमती देसाई यांना ही अश्रू अनावर झालेत,एक अवलिया पुनः यायची खोटी आशा दाखवून पुढील वाटचालीस मार्गस्थ झाला,एक मुलगी,सून,पत्नी,आई,बहीण मैत्रीण,आणि अधिकारी म्हणून श्रीमती देसाई यांनी योग्य न्याय दिला असे मत स्वाती पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना मांडले, गावाच्या विकासाला दिशा देऊन गावाला वेगळी ओळख निर्माण करून दिल्याचं श्री रेवन आप्पा ठाकरे यांनी सांगितले,श्रीमती देसाई यांच्याकडे कधीही शाळेच्या कामानिमित्त गेलो तर त्या आम्हा शिक्षकांना सोबत घेऊन नेहमी शाळेच्या विकासासाठी तत्पर असायच्या असे मत मुख्याध्यापक श्रीमती भागूबाई ठाकरे यांनी मांडले ,तुमच्या जाण्याने आमच्या गावचा विकास खुंटेल त्या साठी तुम्ही परत लवकर या अशी आर्त साद उपसरपंच दत्तू मामा ठाकरे यांनी घातली,गावाचा विकास साधतांना एकटा ग्रामसेवक काही करू शकत नाही त्यासाठी 16 वर्ष माझ्या गावाने पण तुम्हाला भरपूर साथ दिल्याचं प्रतिपादन श्री भाऊसाहेब ठाकरे यांनी केलं,तुमच्यात 4 गुण सर्वात चांगले होते त्यापैकी त्यांच्याकडे केव्हाही गेलो तरी सर्व ताणतणाव बाजूला सारून त्या नेहमी सहकार्यासाठी तयार असायच्या अस मत मुख्याध्यापक श्री दौलत खूटे यांनी व्यक्त केलं,ग्रामसेवक हा प्रशासन आणि जनता यातील महत्वाचा दुवा असतो, विकास काम करतांना कुठलाही दबाव न घेता बेधडक निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आहे असं मत प्रस्ताविक करतांना श्री गणपत राव ठाकरे यांनी व्यक्त केलं,शेवटी श्रीमती देसाई यांनी हे गाव माझं माहेर आहे 16 वर्ष तुम्ही मला मायेची सावली दिली ,इथल्या मातीला मी कधीच विसरणार नाही,गावाचा विकास हा एकट्या ने होत नसतो मला वेळीवेळी माजी सरपंच भास्कर खुटे,श्री आंनदा ठाकरे,श्री जगन्नाथ खुटे,सौ मनीषा ताई ठाकरे,विद्यमान सरपंच सौ कविता ताई ठाकरे,श्रीहरी ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले ,गावाच्या विकासात त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. तुम्ही आज इतका मोठा निरोपाचा कार्यक्रम ठेवून जड अंतःकरणाने माझी पाठवणी करता आहात, मी शब्द देते की मी पुन्हा परत येईन अशी ग्वाही डोळ्यातुन आलेल्या अश्रूंच्या साक्षी ने दिली व सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमास श्रीमती देसाई यांचे पती श्री संदीप पवार,बालपणीची मैत्रीण स्वाती पाटील ,श्री कमलेश पाटील ,मुलगा संस्कार,आई वडील,भाऊ,सासू सासरे ,दिर नणंद ,गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ कविता ठाकरे,माजी सरपंच सौ. मनीषा ठाकरे,माजी सरपंच श्री आंनदा ठाकरे,सो सा माजी चेअरमन श्री रामदास ठाकरे ,बापू ठाकरे, श्रीहरी ठाकरे,सुनील ठाकरे, निर्मला ठाकरे,निशा पवार,राधिका ठाकरे,साहेबराव कर्डेकर,सुशीला ठाकरे,रत्ना पवार, मनीषा पवार,भास्कर खुटे, दामोदर नवले,केशव तासकर ,कृषी अधिकारी मृणाल देशमुख, कृषी अधिकारी प्रज्ञा कोकाटे,ग्रामसेवक श्रीमती बनसोड ,बाळू खुटे,किशोर खुटे,सुखदेव खुटे,भास्कर नवले,सविता हिरे,शितल ठाकरे, परिघा कासव,छाया खुटे,योगेश खुटे,छाया जगन खुटे,भिकाजी खुटे,प्रकाश ठाकरे,गंभीर साबळे,चंद्रकांत खुटे,कोमल साबळे,गगा बाबा शिंदे,लहान थोर ,अबाल वृद्ध,महिला वर्ग उपस्थित होता, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपतराव ठाकरे व प्रकाश पवार यांनी केले.तसेच,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उद्धव ठाकरे, प्रकाश पवार,आंनदा ठाकरे,बापू ठाकरे ,दत्तू खुटे,विकास साबळे,पानसरे सिस्टर,शिवाजी सयाजी ठाकरे, भागूबाई ठाकरे, संदीप ठाकरे, दत्तू मामा ठाकरे, अशोक नवले,संदीप नवले,गणपत ठाकरे,सौरभ पवार,दर्शन पवार यांनी मोलाचे योगदान देऊन यशस्वी आयोजन केले

निरोप भाषणात श्रीमती देसाई यांनी सांगितले:

> “हे गाव माझं माहेर आहे. तुम्ही मला मायेची सावली दिलीत.
मी या मातीला कधीच विसरणार नाही. मी पुन्हा नक्की येईन!”

अश्रूंच्या साक्षीने दिलेला निरोप एक दिवस पुनः भेटवेल याचीच आशा…

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »