कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथे दि,१६/जूलै ते २३जूलै या कालावधीत श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री सच्चिदानंद केरोबा महाराज यांच्या आशीर्वादाने पंचक्रोशीतील किर्तनकार प्रवचनकारां च्या सहकार्यने करण्यात येणार आहे दिनांक १६जुलै पहाटे भागवत धर्माचा ध्वज उभारुन ४ते६काकडा भजन सकाळी ८ते ११ गाथा पारायण सायंकाळी ६ते७हरीपाठ व रोज श्री सावता महाराज ग्रंथाचे पारायण व रात्री किर्तने बुधवार दिनांक १६जुलै ह;भ,प, अशोक महाराज निकम १७ ला पावशे महाराज जालना १८ला पुरषोत्तम महाराज घुमरे १९रोजी सागर महाराज भालेराव २०रोजी प्रभाकर महाराज शिंपी जळगाव खान्देश २१रोजी ज्ञानेश्वर महाराज शिंदे रुई आश्रम मंगळवार २२ला श्रावण महाराज कुकाणेकर यांचें तर बुधवारी २३ ला सकाळी ८ते १०वाजता संत सावता महाराज पालखी मिरवणूक काढण्यात येईल व १०ते१२ या कालावधीत ह,भ,प, बाबाजी महाराज गायकवाड यांचे काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी वाहेगांवसाळ पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित रहाणार आहेत या कार्यक्रमाला संत जनार्दन भक्त नवनाथ भक्त मंडळ स्वाध्याय परिवार तुळशीगड बिल माळ भक्त गण व शिवभक्त परिवार तुरुणमित्रमंडळ व महात्मा फुले सांस्कृतिक मित्र मंडळ व वाहेगावसाळ ग्रामस्थ परिश्रम घेणार आहे

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »