कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):- अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत माध्यमिक विद्यालय राहुड शाळेत महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळाकडून आठवी ते दहावीपर्यंत 57मुलींना मोफत पास देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळाचे अधिकारी कानडे साहेब,निकाळे साहेब,
गायकवाड साहेब,वाहक उपस्थित होते. माध्यमिक विद्यालय राहुड शाळेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मा.आ.शिरिषभाऊ कोतवाल यांच्या प्रयत्नातून प्रथमच मनमाड,दुगाव,उसवाड,राहुड माध्यमिक विद्यालय राहुड मार्गे ते नांदुरटेक. सकाळी 10.30 वाजता व सायंकाळी 5 वाजता अशी मनमाड आगाराकडून बससेवा सुरु करण्यात आली.त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी ग्राम विकास संस्थेच्या वतीने मनमाड आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय समितीचे रमेश मामा पवार,वाल्मीक पवार,खंडू सोमवंशी,आनंदा पवार,नामदेव पवार,नामदेव मुरलीधर पवार, राजू निकम,रमेश सोमवंशी, नांदूरटेकचे प्रभाकर ठाकरे, गोरख शिंदे,राजाराम ठाकरे, गोरख ठोके,जगन आहिरे, समाधान पवार, माध्यमिक आबा सोमवंशी, मधुकर निकम, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ठाकरे .जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम,सूर्यवंशी चंद्रकांत चव्हाण, रत्नमाला,देवरे सुनीता,वाघ रवींद्र कुंदन हिरे,राहुड व नांदूरटेक शेडवस्ती वरील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या या सेवेमुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. बसचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »