Search for:
  • Home/
  • कृषीन्यूज/
  • एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा कालावधी महसूल सप्ताह…

एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा कालावधी महसूल सप्ताह…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) 1 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. शासन निर्णय दिनांक 29 जुलै 2025 च्या मार्गदर्शक सूचनानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा कालावधी महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार चांदवड तालुक्यामध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या महसूल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी चांदवड तालुक्यामध्ये मागील वर्षी उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महसूल विभागातील कर्मचारी ही समाजाचे देणे लागतात या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच महसूल विभागाकडील कामाचा व्याप पाहता बऱ्याच कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे.
महसूल सप्ताहातील सर्व दिवसाच्या कार्यक्रमां चे नियोजन माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले असून याबाबत सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनासर्व कार्यक्रम उत्साह मध्ये राबविण्यात यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पत्रकार -

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

Translate »