दिघवद जिल्हा परिषद आदर्श शाळेचे ‘ध्यास गुणवत्तेचा’ युट्यूब चॅनल
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- चांदवड :तालुक्यातील दिघवद येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना या साधनांच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी व त्यांच्या उपक्रमांना प्रेरक असे ‘ध्यास गुणवत्तेचा’ या नावाने नवीन डिजिटल युट्यूब चॅनेल सुरु केले असून क्यू आर कोड तयार केलेला आहे. सदर क्यू आर कोड स्कॅन करून या शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम बघता येतील. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल अंतर्गत सुरु असलेले FRE शिक्षण,BALA शिक्षण, सेल्फी विथ सक्सेस, इनहाऊस,इंटर हाऊस स्पर्धा, आनंददायी शनिवार, स्पेलिंग बी, मॅथ बी, आनापान, योगासने, चाळीस पर्यंत पाढे पाठांतर, विद्यार्थ्यांचे दोन्ही हातांनी लेखन,
इंग्लिश संभाषण, वृक्षारोपण या सारख्या अनेक उपक्रमांचा या चॅनल माध्यमातून समावेश करण्यात आला आहे. आज या युट्युब चॅनेलचे उदघाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोविंद गाढे उपाध्यक्ष श्री. राहुल मापारी तसेच तसेच उपस्थित सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश बंजारा यांनी या चॅनेलची निर्मिती केली आहे.
