काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार)
मनमाड येथून जवळच असलेल्या वागदर्डी येथील उज्ज्वलप्रकाश कला ,वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास सन 2025 -26 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. वागदर्डी महाविद्यालयाची दर वर्षी नवीन विभागाची मान्यता मिळत असून शिक्षणाच्या विकासात आणखी एक विकासाचा तुरा रोवला गेला.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामुळे वागदर्डी येथे, नोकरी करून ग्रॅज्युएशन पूर्ण करता येणार आहे वंचित असलेल्या घटकांना घरी बसून नोकरी करून रोजंदारीकरण बीए पदवी निवडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे सदर प्रवेशासाठी दिनांक 10 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू असून ज्या उमेदवारांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर वागदर्डी महाविद्यालयात संपर्क करावा , असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रकाश जैन सचिव उज्वला जैन प्राचार्य डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी केले आहे.
सदर विद्यापीठाची शाखा मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी संस्थेचे अभिनंदन केले


