श्री. उत्तम आवारे (पत्रकार) काजी सांगवी: वागदर्डी (ता. चांदवड): तालुक्यातील वागदर्डी येथील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व सीनियर कॉलेजमध्ये महाराज स्वाभिमान योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तालुक्याचे माननीय तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना दाखले वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक, तसेच सर्कल अधिकारी, कामगार तलाठी वर्ग, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराज स्वाभिमान योजना ही विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, प्रत्येक विद्यार्थ्याने या संधीचा फायदा घेत शिक्षणात उत्तम प्रगती करावी. त्यांनी विविध शासकीय योजना, दाखल्यांचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याविषयी देखील उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने तहसीलदार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.









