कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):-सरकारचे “शासन आपल्या दारी” ह्या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज,महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी शालेयपयोगी दाखले त्यात जात प्रमाणपत्र,डोमिसाईल, नॉन क्रिमीलेअर,उत्पन्नाचे दाखले इत्यादींचे वाटप स्वामी विवेकानंद विद्यालयात करण्यात आले. या वेळी उपस्थित अधिकारी वर्गाची ओळख शाळेचे पर्यवेक्षक किशोर गांगुर्डे यांनी करून दिली.तसेच शाळेच्या वतीने उपस्थित अधिकारी वर्गाचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शासनाने सुरू केलेले या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व योजनेचे महत्व व माहिती सांगितली. शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे विद्यार्थी,पालक यांनी समाधान व्यक्त केले. दाखला काढताना येणाऱ्या अडचणींपासून पालक व विद्यार्थी वर्गाची सुटका होवून त्यांची गैरसोय दुर झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक एस.डी.गांगुर्डे यांनी सांगितले व उपस्थित अधिकारी वर्गाचे आभार मानले. याप्रसंगी प्रसगी मंडळ अधिकारी भैरवनाथ धायगुडे,तलाठी अभिजीत अहिरे, केंद्रप्रमुख निवृत्ती बच्छाव, सरपंच रावसाहेब गांगुर्डे, संस्थेच्या संचालिका बनुबाई गागरे, मुख्याध्यापक सदाशिव गांगुर्डे,पर्यवेक्षक किशोर गांगुर्डे,गामस्थ बाबाजी गांगुर्डे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »