चांदवड
मुंबई–आग्रा महामार्गावर चांदवड नजीकच्या राहुड घाटात गॅस टँकर आज सकाळी पलटी झाला. टँकरमधून गॅस गळती होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून शेकडो वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिस व आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र गॅस गळती थांबेपर्यंत वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »