कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड : श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालया तर्फे “अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५” या स्पर्धात्मक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ५९ विद्यार्थी संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन मधील निवडलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवर अभिनव उपाययोजना सादर केल्या. याशिवाय काही संघांनी ‘स्टुडंट इनोव्हेशन’ या विभागांतर्गत स्वनिर्मित संकल्पनांचे सादरीकरण केले. आरोग्यसेवा, शिक्षण, शाश्वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन इत्यादी विविध क्षेत्रांतील समस्यांवर विद्यार्थ्यांनी दिलेले उपाय विशेष लक्षवेधी ठरले.
विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नाविन्य व नवकल्पना, तांत्रिक व्यवहार्यता व गुंतागुंत, सामाजिक लाभ व परिणामकारकता, शाश्वतता व विस्तार योग्यता, सादरीकरण व संघभावना या निकषांनुसार करण्यात आले. सदर निकषांवर आधारित परीक्षण व मूल्यांकन खालील मान्यवरांनी केले : डॉ. पी. आर. बाविस्कर, डॉ. आर. के. अग्रवाल, डॉ. के. एम. संघवी, डॉ. आर. आर. भंडारी, डॉ. के. आर. निर्मल , डॉ. एन. पी. बोरा, डॉ. एल. बी. पवार, डॉ. एस. बी. जाधव, प्रा. पी. एम. येवले, प्रा. आर. एम. सोनार, प्रा. वाय. एस. राठोड, प्रा. डी. एस. राजनोर, प्रा. वाय. के. देसाई, प्रा. व्ही. सी. जाधव, प्रा. डी. डी. संचेती प्रा. एम. व्ही. कुंभार्डे, प्रा. जी. एच. देशमुख व प्रा. ए. बी. कोल्हे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. गुंजन देशमुख (एस.पी.ओ.सी) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितेचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे मुख्य समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा,उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, विश्वस्त समिती सदस्य तसेच प्रबंध समितीचे मानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, विश्वस्त समिती सदस्य व महाविद्यालयाचे समन्वयक सुनीलकुमार चोपडा, प्रबंध समिती सदस्य व महाविद्यालय समन्वयक योगेश मोदी, अभिजित मोदी आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. जी. तातेड, उपसंचालक डॉ. एम. आर. संघवी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक व्यक्त करून त्यांना आगामी राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »