मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 पारितोषिक वितरण सोहळा चांदवड येथे उत्साहात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -दिनांक – 27 सप्टेंबर रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग चांदवड यांच्या सौजन्याने मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा -2 पारितोषिक वितरण आणि शैक्षणिक विविध गुणगौरव कार्यक्रम जे आर जी विद्यालय चांदवड येथे पार पडला.चांदवड देवळा विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ राहुलदादा आहेर याच्या उपस्थितीत तालुक्यातील पुरस्कारप्राप्त शाळांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच उपक्रमशील शाळा, गुणवंत शिक्षक यांचाही गुणगौरव करण्यात आला.जि प आदर्श शाळा दिघवद शाळेचा मॉडेल स्कूल स्पर्धेत चांदवड तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याने शाळेचा सत्कार डॉ.राहुलदादा आहेर आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.तसेच प्रकाश बंजारा उपशिक्षक यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रमास तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. मच्छिन्द्र साबळे,मा. रामचंद्र बोडके ,मा.शितल तावडे गटशिक्षणाधिकारी चांदवड शिक्षण विस्तार अधिकारी मा.वसंत खैरनार,मा.भाऊसाहेब निकम मा. कुसूम खैरनार,शिक्षक समिती राजाध्यक्ष काळूजी बोरसे केंद्रप्रमुख मा. निवृत्ती बच्छाव, मा राजेश उबाळे,मा.सुनिता गवारे
सुनंदा जाधव
दिपक निकम
विषयतज्ञ,पंचायत समितीचे सर्व अधिकारी,मुख्याध्यापक उपस्थित होते

पत्रकार -

Translate »