शासनाचा जनकल्याणकारी बांधकाम कामगार मंडळ योजना गरिबांच्या हितासाठी…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड : चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात नेहमी विविध योजना राबवत अग्रेसर असणारे डॉ .राहुल आहेर आणि भूषण कासलीवाल यांनी गोरगरिबांसाठी आणि जनकल्याासाठी विविध योजना राबवत जन हितार्थ आपले निर्णय घेतले आहे.

अशाच कल्याणकारी योजनांपैकी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने पुरुष व महिलांसाठी शासनाच्या बांधकाम कामगार या योजनेतील घरगुती भांडी संच वाटप चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या माध्यमातून राबवून या महिला पुरुष यांना न्याय दिलासा दिला आहे.

गेल्या दोन वर्षापासून अनेक नागरिकांनी या योजनेचे फॉर्म भरले होते.परंतु यांना कार्ड वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक महिला या योजनेस वंचित असून यांना न्याय देण्यासाठी भूषण कासलीवाल यांनी आमदार डॉ.राहुल आहेर व बांधकाम विभागाचे मंत्री मा.आकाश फुंडकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा वारंवार पाठपुरावा करत कार्ड मिळून दिले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आमदार श्रीकांत भारतीय,यांच्या माध्यमातून शासनाकडून या योजना राबविण्यास वेळोवेळी अधिक मदत उपलब्ध झाली.

सर्व प्रकारचे बांधकाम कामगार विभाग यांच्या माध्यमातून जवळपास हजारो नागरिकांची नाव नोंदणी केली असून लवकरच यांनाही या योजने अंतर्गत 32 योजनांचा लाभ होण्याकरीता व कामगारांची गैरसोय होऊ नये याकरिता लवकरच तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय चालू करून सर्वांना वेळेवर भांडी संच उपलब्ध करून मिळेल तसेच इतर योजनेचा लाभ दिल्या जाईल असे आश्वासन डॉ.राहुल आहेर यांनी दिले.तसेच सर्वांना वेळोवेळी मदत करू आणि या गोरगरीब जनतेला न्याय देऊ असे प्रतिपादन भूषण कासलीवाल यांनी केले.

स्व.मा.आ.जयचंदजी दि.कासलीवाल चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून या वेळी चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर , चांदवड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे,विठ्ठल आवारे,शिंगवे गावचे सरपंच आत्माराम खताळ, काशिफ खान,सुभाष पुरकर,गीता झाल्टे,पत्रकार व आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.सुरेश पाटील सर यांनी केली तर सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले.

डॉ.राहुल आहेर व भूषण कासलीवाल यांनी शासनाकडून मिळत असलेल्या योजनांची माहिती दिली.यात वेळोवेळी बदल होत असून कार्यरत असलेल्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले.

oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.५१,०००/
oकामगाराच्या पहिल्या मुलीसाठी ५१,०००/- व दुसऱ्या अपत्यासाठी ३१०००/- दिले जातात.
oव्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.
oनोंदणीकृत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/अर्थसहाय्य
oनोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
oनोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
oनोंदीनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/ किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/- .
oनोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/-
oपदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/-
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती
oबांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना
oनोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/-
oनोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)
oपती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव
oनोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य
oनोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-
oनोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).
o मोफत रक्त तपासणी त्यात काही आजाराची लक्षणे दिसत असेल तर त्यांना आऊषोधौपचार
o प्रतिव्यक्ती ७०००००/- किंमतीचा आरोग्य विमा.
(शासन स्तरावरून वेळोवेळी बदल केले तर त्यानुसार या योजनेचा लाभ देण्यात येतो किंवा यातील काही योजनेच्या रकमा कमी अधिक करण्यात आलेल्या आहे याची नोंद घेण्यात यावी.)

पत्रकार -

Translate »