सकल मराठा परिवार च्या वतीने पूरग्रस्त बीड परिसरात मदत.

उत्तम आवारे कृषी न्यूज:एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन सकल मराठा परिवार नाशिक मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धाऊन आले.
सतत चालू असलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्याला जगवणारा शेतकरी, त्याचं कुटुंब, शेत, गोठा ,गुर ढोर,उभी पिक,घर ,या आसमानी संकटात वाहून गेली आहेत.त्याचे अतोनात हाल झाले त्यांचे दुःख आपण वाटून घेऊ शेकत नाही पण त्यावर मदतीची फुंकर घालू शकतो यासाठी त्यानां आपल्या कडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा, कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद निर्माण करू शकतो.यासाठी सर्व नाशिककरांना मदतीचे आवाहन करण्यात आले.त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला यात जीवनावश्यक
तांदूळ ,गव्हाचे पीठ,सर्व प्रकारच्या डाळी,भिस्कीट पुडे, फरसाण,तेल, पोहे,चहा पावडर,साखर,मॅगी
ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,बेडशीट, नवीन साडी हे मदतीच्या स्वरूपात घेण्यात आले तसेच मुलांसाठी शालेय दप्तर, वही पेन अशा वस्तू घेतल्या .या सर्व वस्तूंचे साखर,तांदूळ, आटा,गहू, तेल,चहापुडा, साबुदाणा, साबण असे किट तसेच. स्कूल बॅग, पाच वही,कंपास, चित्रकला वही असे किट तयार करण्यात आले या ३०० कीटचे वाटप बीड तालुक्यातील कट चिंचोली या गावात करण्यात आले.ही किट वाटप केल्याबद्दल गावाच्या वतीने गावचे सरपंच रवी निवारे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मनपूर्वक आभार मानले.

पत्रकार -

Translate »