चांदवड आयटीआयमध्ये अल्पमुदतीच्या कोर्सचे उद्या उद्घाटन


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) | प्रतिनिधी
चांदवड येथील महाराजा सूरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध अल्पमुदतीच्या नवयुगीन कोर्सचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे यांनी दिली.
संस्थेमध्ये टुव्हीलर, फोरव्हिलर सर्विस टेक्निशन, लाइट मोटर व्हेइकल ड्रायव्हर, फिटर फॅब्रिकेशन, एलईडी लाईट रिपेअर, सोलर इन्स्टॉलेशन टेक्निशन, टुरिझम कोऑर्डिनेटर व डिजिटल मित्रा असे एकूण आठ अल्पमुदतीचे कोर्स सुरू करण्यात येत आहेत. या सर्व कोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास वराडे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकूण ३०० प्रशिक्षणार्थ्यांना तीन महिन्यांचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे प्रशिक्षणार्थी कौशल्यसंपन्न बनून विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

पत्रकार -

Translate »