जागर होळकरशाहीचा…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)रविवार दि.12 ऑक्टोंबर 2025 रोजी होळकरवाडा (रंगमहाल) चांदवड (जि. नाशिक) येथे लोकमाता गंगाजळनिर्मळ मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित साप्ताहिक महाआरती कार्यक्रमास श्री सप्तशृंगी महिला मंडळ, डांबर विहीर परिसर, वरचे गाव, चांदवडच्या महिला सदस्या उपस्थित होत्या. जन्मोत्सव समितीचे प्रमुख प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर यांच्यातर्फे उपस्थित मान्यवर व महिलांना मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित डॉ. वर्षा चौरे लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चरित्र ग्रंथ भेट देण्यात आले.यावेळी महाआरती कार्यक्रमास श्री अशोक काका व्यवहारे, संत एकनाथ महाराज पैठणकर यांचे कृपापात्र शिष्य परिसा भागवत पैठणकर, संजय पाडवीसर,प्रा. सुरेश सलादे सर वडनेरभैरव, शिल्पकार श्री. व सौ. मानसिंग ढोमसे नशिक, श्री. किरण जाधव, सौ. आरती जाधव नाशिक, पुरोहित अमोल दीक्षित , श्री सप्तशृंगी महिला मंडळ सदस्या सौ. मनीषा कोल्हार,सौ.रेश्मा देवरे, सौ.पुजा पवार , सौ.मनिषा लुटे,सौ.माधुरी लुटे , सौ.अंजली सुतारे ,सौ.आशा चौबे , सौ.उषा चौबे ,सौ.अनिता खैरनार , सौ.अर्चना कोकणे,सौ.भारती कोकणे आदी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.


