अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना न्याय मिळणेबाबत- चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने,चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना न्याय मिळणेबाबत.

आज चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले,आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर,उपजिल्हाप्रमुख रवींद्र काळे,तालुकाप्रमुख विलास नाना भवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या,यात प्रमुख मुद्दे म्हणजे
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतक-यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ, महागडी खते व औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असुन उत्पादन खर्च वसुल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजारभाव नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही काहीकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहे.
या पार्श्वभुमीवर शेतक-यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हिच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमुक्ती सर्व प्रकाराच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालु बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दूध उत्पादक शेतक-यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी.
प्रमुख मागणी
१. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतक-यांना हेक्टरी रुपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी.
२. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतक-यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे.
३. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथील करुन पंचनाम्याची प्रक्रिया बाजुला ठेवत विम्याची रक्कम त्वरीत शेतक-यांच्या खात्यात जमा करावी.
४. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा.
५) फळबागांच्या नुकसानी पंचनामे व्हावे.
याप्रसंगी सोमनाथ पगार, केशव ठाकरे,घमाजी सोनवणे,प्रसाद प्रजापत, गुड्डू खैरनार,अशोक शिंदे,शंभू खैरे,साहेबराव चव्हाण,ज्ञानेश्वर आवारे,भाऊसाहेब वाघ,बापू ठाकरे,नवनाथ जाधव,अजय यशवंते,सौरव देशमाने,पप्पू खैरे,विनायक पवार, व शिवसैनिक उपस्थित होते,

पत्रकार -

You may have missed

Translate »