कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार हे गुरुवार दि. १६ ॲाक्टोंबर रोजी चांदवड तालुका दौऱ्यावर येत असून आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार हे प्रत्यक्ष तालुकावार दौरा करुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेत आहेत. या दौऱ्यांतर्गत गुरुवार दि.१६ ॲाक्टोंबर रोजी चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे.

या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक धोरण, पक्षाची भूमिका, कार्यकर्त्यांची जबाबदारी व निवडणूक लढवण्यासाठीची रणनीती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गुरुवार, दि.१६ ॲाक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चांदवड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष रघुनाथ आण्णा आहेर व शहराध्यक्ष गोकुळ देवरे यांनी केले आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »