कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): मागील महिन्यात अतिवृष्टीने संबंध महाराष्ट्रावर थैमान घातले. मराठवाड्यात तर अक्षरशा जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी होते. हजारो शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. घरदार जनावरे दगावली. शेतकऱ्यांची झालेली
अतोनात नुकसान बघून सोमठाणे गावचे राजेंद्र (लल्ला) तिवारी यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एक लाख 11 हजार 111 रुपये चा चेक सिन्नर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्याकडे सुपूर्द केला.
राजेंद्र तिवारी यांचा सोमठाणे गावात शेतकऱ्यांपासून घेतलेल्या दुधाचा खवा बनविण्याचा छोटासा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी जीवनाशी ते नेहमी निगडित असतात. पावसाने झालेले नुकसान बघून
आपणही त्यात थोडासा का होईना हातभार लावावा , समाजात वावरताना एक जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील समाजाला काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने आज त्यांनी मदत केली.
कोणतेही समाजहिताचे काम असेल तर तिवारी हे नेहमीच
पुढे असतात. त्यांच्याबरोबर आज गावातील स्थानिक शेतकरी त्र्यंबक रंगनाथ कोकाटे, नितीन पोपट कोकाटे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्माननीय मीराताई सानप उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांकडून राजेंद्र तिवारी यांचे कौतुक व आभार मानण्यात आले.

