हतियाड वस्ती व अहिल्या वस्ती या आदिवासी पाड्यांत ” योग वेदांत सेवा समिती चांदवड ” तर्फे आनंदाची दिवाळी साजरी
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :सोमवार , दिनांक – २० ऑक्टोबर २०२५
हतियाड वस्ती व अहिल्या वस्ती या आदिवासी पाड्यांत ” योग वेदांत सेवा समिती चांदवड ” तर्फे आनंदाची दिवाळी साजरी… प. पुज्य संत श्री आशारामजी बापू आश्रम द्वारा संचलित... " योग वेदांत सेवा समिती चांदवड " तर्फे हतियाड वस्ती व अहिल्या वस्ती या आदिवासी पाड्यात आनंदाची दिवाळी उपक्रमांतर्गत... दिवाळी फराळ , कपडे , गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी छोटेखानी हरीसंकीर्तन व मार्गदर्शनपर प्रवचन घेण्यात आले. समितीचे अध्यक्ष डॉ ए.पी. निकम , सचिव प्रा.डॉ. गोबा शिंदे , प्रा. डॉ. सुरेश पाटील , संजय पाडवी सर , प्रशांत सुताने सर यांनी संवाद साधला. याप्रसंगी पुनम बुरगुडे , सरला प्रजापत , सुवर्णा कोतकर , सोनाली पगार , शितल शिंदे , साक्षी शिंदे , साई ठाकरे , एम. डी. भावसार सर , गोपाल कुमावत , हर्षल शिंदे , ऒंकार साबळे , हेमंत शिंदे , यश शिंदे , सोहम शिंदे , समीर सोनवणे , पार्थ गोसावी , शरद शिंदे , आधार पवार आदी नागरिकांनी सहभागी होत आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित केला.



