कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड पोलिस ठाण्यातर्फे शुक्रवारी (दि. ३१/१०/२०२५) पोलिस शहीद सप्ताह व एकता दिनानिमित्त Run For Unity चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली. पाच किलोमीटर अंतरासाठी पहाटे ०७.०० वाजता ही मॅरेथॉन होणार आहे. BSNL ऑफिस, चांदवड समोर गणुररोड पासून सुरू होऊन २.५ कि.मी. मध्यान्ह झाल्या नंतर पुन्हा वापस येऊन BNSL कार्यालय, चांदवड गणुर रोड येथे समाप्त होणार आहे. सदर मॅरेथॉन सर्व वयोगटातील पुरुष व महिला यांच्यासाठी खुली आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणीसाठी चांदवड पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आंनद पटारे व पोलीस अंमलदार भाऊसाहेब गुळे, प्रदिप आजगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »