कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड – वंदे मातरम गीताचे 150 वर्ष पूर्ण झाल्याने आज नवयुवकानी त्याचे अवलोकन करून वंदे मातरम गीताचे अर्थपूर्ण आचरण करावे असे संबोधन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले.
चांदवड येथील महाराजा सूरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज शुक्रवार दिनांक 07 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे यांनी दिली.
यावेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गीत गायन स्वरा म्युझिकल संस्थेतील चमूने व संस्थेतील प्रशिक्षणार्थनी एकसाथ गायन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कैलास कडलग,नायब तहसीलदार विजयकुमार कचवे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे ,नेमिनाथ जैन विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे,विस्तार अधिकारी कुसुम खैरनार,प्रमुख वक्ते म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेखर उपासनी,पोलिस उपनिरीक्षक भानुदास न-हे,दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे, पत्रकार महेश गुजराथी, डॉ . हेमंत आहिरराव ,पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियता डॉ प्रसाद सोनवणे,सहायक गट विकास अधिकारी सी एम थोरात आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कैलास कडलग,शिवदास शिंदे,डॉ.चंद्रशेखर उपासनी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्राचार्य संदीप भदाणे यांनी केले , सुत्रसंचालन कोपा निदेशक धनंजय दंडगव्हाळ यांनी केले तर आभार सोनाली भंडारी यांनी मानले कार्यक्रमास संस्थेतील गटनिदेशक योगेश जोशी,विनोद पवार,निदेशक,निदेशिका,कर्मचारी,प्रशिक्षणार्थी आदींसह सर्व शाळाचे मुख्याधापक , शिक्षक उपस्थित होते .

