चंद्रपूर: सावकारांच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याने किडनी विकल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय मानवी अवयवांच्या तस्करीच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. कंबोडिया येथे किडनी विक्री झाल्याचा दावा तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.

पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी विक्रीपूर्वी कोलकाता येथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यासाठी त्यांनी चेन्नई येथील डॉ. क्रिष्णा यांच्याशी संपर्क साधला. डॉ. क्रिष्णा यांनी नागपूर ते कोलकाता प्रवासासाठी रेल्वेची तिकिटे पाठविली, आणि कोलकाता रेल्वे स्थानकावर एक प्रतिनिधी त्यांना घेण्यासाठी आला. त्याने प्रयोगशाळेत नेले, जिथे रक्त व आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

त्यानंतर, डॉ. क्रिष्णा यांनी रोशन कुळे यांना विमानाने कंबोडिया देशातील नानपेन येथे नेल्याचा दावा त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

किडनी विक्रीतून मिळालेली रक्कम थेट सावकारांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अवयव विक्री हा स्वेच्छेचा निर्णय होता की सावकारांच्या दबावातून उचललेले टोकाचे पाऊल, याचा तपास सुरू आहे.

रोशन कुळे यांच्या किडनीची शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली, जिथे डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे. यामुळे आता पोलिस किडनी दृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना बुधवारी ब्रह्मपुरी येथील न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.


स्रोत (Source): https://www.lokmat.com/chandrapur/moneylender-or-international-smuggling-behind-kidney-sale-dr-krishna-who-sent-a-farmer-to-cambodia-on-police-radar-a-a452-c1013/

पत्रकार -

By admin

0 thoughts on “किडनी विक्री प्रकरण: सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?”
  1. Hello krushinews.com,

    Do you find it challenging to attract new leads and increase website visitors?

    Can I provide you with some additional detailed solutions?

    Well wishes,
    Terry Fowler | Digital Marketing Manager

    Note: – If you’re not Interested in our Services, send us “opt-out”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »