चांदवड तालुक्यातील हिरापूर येथे सालाबादा प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे) :–चांदवड तालुक्यातील हिरापूर येथे साला सालाबादा प्रमाणे दि23रोजी पासुन अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला असुन दररोज पहाटे 4ते 6काकडा आरती सकाळी 9ते 11भागवत पारायण सांयकाळी 6ते7सामुदायिक हरीपाठ व रात्री 9ते11दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह .भ .प. सुवर्णाताई जमधाडे (येवला) ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव) ह. भ. प. कृष्ण महाराज कमानकर (भेंडाळी)ह.भ.प.रमेश महाराज गांगुर्डे, (कळमदरेकर)ह. भ. प. समाधान महाराज पगार (भटगाव )ह. भ. प. आनंद महाराज कांजवाडेकर ह. भ. प. श्रवण महाराज जगताप( विसापूरकर), ह. भ. प .बाळासाहेब महाराज रंजाळे (श्रीरामपूर) आदींचे किर्तन सेवा संपन्न होणार आहे .तसेच दि. 30रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे काल्याचे किर्तन होईल महाप्रसादाने साप्ताहची सांगता होईल.
हिरापुर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती असे आवाहन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका उपाध्यक्ष आत्माराम मोहिते पाटील भंडारे सर भाऊसाहेब चव्हाण अनिल कांगुणे सोमनाथ चव्हाण किसन चव्हाण संतोष चव्हाण भावराव कांगुणे किशोर कहडणे अभिजित गांगुर्डे श्रीराम भंजनी मंडळ व सप्ताह कमिटी व गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात येत आहे .

पत्रकार -

Translate »