मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा
“आपल्या विविध मागण्याचे निरक्षण करण्यासाठी आम्ही आपल्या बांधावर आलो आहोत चांदवड तालुका हा दुष्काळ ग्रस्त आहेत हे मला माहीत आहे आम्ही सत्तेत आहेत विरोधक नाही फोटो काढून बातम्या लावण्यासाठी नाहीत तर त्या मार्गी लावण्यासाठी मी जातिन महाराष्ट्र दौरा करून शेतकरी संवाद आपल्या बांधावर करत आहेत “
प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव
दिघवद वार्ताहर: चांदवड तालुक्यांत दिघवद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव व नाशिक जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे समनवयक योगेश रायते व चांदवड तालुका प्रमुख विकास भुजाडे आदी मान्यवर दिघवद येथे विविध शेतात जाऊन पाहणी केली यावेळी उपस्थित शेतकर्यांचे विविध अडचणी समजावून घेतल्या यावेळी आर, व्हि पाटील कचरू गांगुर्डे निवु्ती घुले बबन गाडे गणेश निंबाळकर विठ्ठल गांगुर्डे अमर मापारी सर्जेराव गांगुर्डे यांनी कांदा अनुदान मिळावे कांदा निर्यात लाइट बिला संदर्भात माफी मिळावी पिक विमा योजना मिळावी अशे विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत तर चांदवड तालुका हा आवर्तन ग्रस्त असलेल्या तालुका आहे आजही विहिरी कोरड्या ठाक आहे पावसाळ्यात रिमझिम पाऊस झाला त्यावर शेतकऱ्यांनी मका सोयाबीन मुग बाजरी आदी पिके पेरणी केली असुन मका एक ते दोन फुट झाली आसुनबिटी वाढली नाही तर सोयाबीन सारखें पिके काही ठिकाणी वाळूली आहे कडधान्य व खरीप पिके पावसाअभावी खुजे झाले आहेत आज विहिरी कोरड्या असुनही लाइट बिल भरमसाठ येत आहेत जनावरे कशे पाळावे अनुदान दिले तरच दसरा दिवाळीच्या दिवशी सण साजरा होईल तशेंच चांदवड तालुका आवर्तन ग्रस्त आहेत या तालुक्यात पाट किंवा धरण नसल्याने दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यातील पुणेगाव ते डोंगरगांव कालव्याचे दर पंच वार्षिक निवडणुकीत राजकारण केले जाते तर त्या कालव्याला पाणी सोडलं तर तालुक्यातील काही गाव ओलिताखाली येतील व चांदवड मार्ग नार पार इंग्रजांनी केलेला सर्व त्या मार्गाने कालवा केला तर चांदवड तालुका ओलिताखाली येईल अशे विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या यावेळी तुमच्या पुर्ण मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सुपुर्द करण्यात येइल अशे सांगितले त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न मी करील आम्ही सत्तेत आहे आम्ही विरोध नाही शेतकर्यांचा बांधावर जाऊन फोटो काढून बातम्या देण्यासाठी नाहीत तर शेतकर्यांचे विविध समस्या जाणून घेण्यासाठी मला मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या बांधावर पाठवले आहेत यावेळी जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागातील शेतकर्यांचा बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी पाठवले असुन कांदा भाव पडल्याने शेतकरी अंगावर आले तरी आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेऊ शेतकर्यांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु अशे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी सांगितले यावेळी राजेंद्र पाटील विठ्ठल गांगुर्डे बबनराव गाडे अमर मापारी सर्जेराव गांगुर्डे दिलीप गांगुर्डे कैलास पगार पुंडलिक गाडे नारायण गाडे बाबाजी गांगुर्डे योगेश गांगुर्डे दौलत गांगुर्डे चांदवड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते