उसवाड येथील वीज पडून मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या कुटुंबियांना शिवसेना प्रणित शेतकरी सेना अध्यक्ष विठ्ठल जाधव यांच्या वतीने एक लाखाची मदत

काजी सांगवी ( वार्ताहर भरत मेचकुल): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल राव जाधव यांनी सुरू केलेली शेतकरी संवाद यात्रा चांदवड तालुक्यात मुक्कामी आली असताना पालकमंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांनी तात्काळ श्री जाधव साहेबांशी संपर्क साधून चांदवड तालुक्यातील उसवाड येथे विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या शेतकरी शेतमजूर कै. सौ मीना बटाव उसवाड यांच्या कुटुंबीयास भेटण्याचे सुचना केली त्या अनुषंगाने माननीय जाधव साहेबांनी तात्काळ बटाव कुटुंबियाची उसवाड येथे राख सावरण्याचा कार्यक्रम स्मशानभूमीत चालू असताना तिथे जाऊन सांत्वन पर भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि कुटुंबीयास तात्काळ एक लाख रुपयांची मदत केली तसेच माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले..

त्याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विकास भुजाडे संदीप उगले फौजी नाना घुले दत्ता गांगुर्डे दीपक शिरसाठ निलेश ढगे दीपक भोईटे बापू आहिरराव विठ्ठल गांगुर्डे जनार्दन पवार मनोज सुर्यवंशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…

पत्रकार -

Translate »