उर्धुळ मध्ये राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान (RAD)प्रकल्पास मा.संचालक विस्तार महाराष्ट्र राज्य पुणे दिलीप झेंडे साहेब यांनी दिली भेट

दिघवद (कैलास सोनवणे) : मौजे उर्धुळ येथे दि. 27/9/2023 रोजी सन 2022-23मध्ये राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान (RAD)प्रकल्पास मा.संचालक विस्तार महाराष्ट्र राज्य पुणे दिलीप झेंडे साहेब यांनी भेट दिली. या प्रकल्पा अंतर्गत लाभ दिलेले लाभार्थी श्री दादा मुुरलीधर ठाकरे यांच्या पशुधनाची तपासणी केली.त्यावेळी सदरील लाभार्थ्यांने या योजनेतंर्गत त्यांनी घेतलेल्या पशुधनापासून होणारा फायदा सांगितला तसेच त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे कुंटुबाच्या उदर निर्वाह साठी हातभार लागतो असे सांगितले तसेच पशुधनापासून मिळणारे शेणखत स्वतःच्या शेती साठी उपलब्ध झाले त्यामुळे त्यासाठी येणारा आर्थिक खर्चात बचत झाली.भेटीच्या दरम्यान मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक श्री.विवेक सोनवणे साहेब, कृषि विकास अधिकारी नाशिक श्री कैलास शिरसाठ साहेब, मा.उपविभागीय कृषि अधिकारी संजय सुर्यवंशी साहेब, तालुका कृषी अधिकारी बागुल साहेब, मा.मंडळ कृषी अधिकारी मनिषा जाधव मॅडम, कृषी पर्यवेक्षक श्री पाटील साहेब, कृषिसहाय्यक सुरेखा पाटील मॅडम कृषिमित्र निवृत्ती ठाकरे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी सरपंच श्रीहरी ठाकरे. उपसरपंच दत्तू मामा ठाकरे,उध्दव ठाकरे,रविंद्र नवले,प्रकाश पवार,सयाजी ठाकरे ,सचिन ठाकरे,राजेंद्र खुटे, वाल्मिक खुटे, दामु खुटे, भिला देवरे, संदिप ठाकरे,बाबाजी टेलर. ग्रामपंचायत कर्मचारी दत्तू खुटे ,विकास साबळे उपस्थित होते

पत्रकार -

Translate »