चांदवड तालुक्यातील आरोग्य केंद्रा मध्ये सुविधांचा वनवा !!!


काजी सांगवी (दशरथ ठोंबरे):-चांदवड तालुक्यातील आरोग्य केंद्रांची अतिशय दयनीय अवस्था असून झाली असून ग्रामीण भागातील केंद्रामध्ये सविधाचा वनवा असल्याने ग्रामीण जनतेला वेळेत उपचार मिळत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्रातल्या ढासळलेली आरोग्य यंत्रणेच्या झाडाझडती घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर व शिवसैनिकानी तालुकयातील आरोग्य केंद्रांना भेटी दिलाने या प्रकार उघड झाला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर तालुका प्रमुख विलास भवर व शिवसैनिकानी चांदवड तालुकयातील काजीसांगवी, तळेगावरोही, उसवाड आदी आरोग्य केद्राना भेटी देऊन तेथिल आरोग्य विभागाचा आढावा घेतला. त्या काजीसांगवी आरोग्य केंद्राच्या इमारतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या असून इतर वार्डात अस्वच्छतेचे प्रमाण आढळले तसेच येथील आरोग्य केंद्रातील टॉयलेट बाथरूम तुटलेल्या अवस्थेत आहे तसेच इमारतीची सोलर सिस्टम गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेली आहे तसेच वैद्यकीय अधिकारी 1,ओपीडी ANM 1, आरोग्य सेवक 3,आरोग्य सेविका 2, CHO 1,आणि शिपाई तीन आदी पद रिक्त असल्याने पुरेशी सेवा मिळत नाही या आरोग्य केंद्र अंतर्गत पाच उपकेंद्र असून त्यापैकी तीन उपकेंद्रांना वैद्यकीय अधिकारी नाही तसेच तळेगाव रोही आरोग्य केंद्राच्या इमारतीची दैनिय अवस्था झाली असुन पूर्ण इमारत धोकादायक असल्याने आजही रुग्णाना जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात इमारतीला गळती लागते .तसेच बहुतांशी कर्मचारी पद रिक्त असल्याने रुग्णाचा उपचारास वेळ लागतो. तब्बल 40 वर्षापूर्वीचे असून अतिशय दुरावस्थेमध्ये उभी आहे तिचे निर्लेखन होऊन नवीन इमारत बांधणे अतिशय गरजेचे असताना सुद्धा प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार समोर येत आहे .कारण नसतांना आरोग्य कर्मचारी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते .कारण नसतांना आरोग्य कर्मचारी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे.पण खरे तर शासनाचे चुकीचे धोरण यासाठी कारणीभूत आहे,यात सुधारणांची अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागले.

मतदार संघातील खासदार आमदार व जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतिनिधी डॉक्टर असून सुद्धा आरोग्य विभागाची दैनिय अवस्था जनतेला पहावयास मिळत आहे

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही शिवसैनिकानी तालुक्यातील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या यामध्ये आरोग्य केंद्रांची अतिशय दयनीय झाली असून बहुतांशी आरोग्य केद्रात कर्मचारी तुटवडा, औषधांचा अभाव, भौतिक सुविधा नसणं आदी बाबी आढळून आल्या यात शासनाने लवकर सुधारणा न केल्या मोठे आंदोलन उभारावे लागेल.” :–नितीन आहेर (शिवसेना जिल्हा प्रमुख उभाठा)

तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या रिक्त पदांबाबत व नविन इमारती बाबत जिल्हा परिषद यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक आरोग्य केद्रावर लवकरच पुरेशा औषध साठा उपलब्ध होईल तसेच रुग्णा योग्य उपचार मिळतील.

पत्रकार -

Translate »