काजीसांगवी येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिर संपन्न

काजीसांगवी येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिर संपन्न


काजीसांगवीः (उत्तम आवारे) : कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी तालुका चांदवड येथे मविप्र समाजाचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव नाशिक व चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग व सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस ॲड .नितीन बाबुराव ठाकरे ,मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड, मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भामरे सर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन बाबुरावजी ठाकरे हे होते. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व धन्वंतरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच याप्रसंगी सरचिटणीस साहेब यांच्या शुभहस्ते विद्यालयातील सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन झाले. सरचिटणीस साहेब यांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष ॲड दौलतरावजी ठाकरे यांनी व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री भामरे सर यांचा सत्कार मविप्रचे जेष्ठ सभासद पुंजारामजी ठाकरे यांनी केला.
यानंतर चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.या सर्व रोगनिदान शिबिरात मेडिसिन,सर्जरी,अस्थिरोग,नेत्ररोग,कान नाक घसा, त्वचारोग,स्त्रीरोग,दंतरोग,छाती विकार,फिजिओथेरपी,बालरोग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये एकूण 270 पुरुष व 134 स्त्री एकुण 404 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी पुढील उपचारासाठी 120 संदर्भित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आले. या कार्यक्रमासाठी मविप्र समाज संस्थेचे ज्येष्ठ सभासद ॲड.दौलतरावजी ठाकरे, ॲड.दिनकरराव ठाकरे, ॲड.भरत ठाकरे,पुंजाराम ठाकरे,बाजीराव मेचकुल,दिनकर माधव ठाकरे, पुंडलिक ठाकरे,दत्ता वाघचौरे,शैलेश ठाकरे,अनिल ठोके,अभिजीत ठाकरे, म्हसु गागरे,शहाजी पाटील,अनिल पाटील,मोठाभाऊ पवार,देवमन पवार, अरुणकाका न्याहरकर,मधुकर टोपे,दशरथ आहेर,रमण आहेर, रमेश निंबाळकर ,अशोक निंबाळकर यांची खास उपस्थिती लाभली.
सर्व रोग निदान शिबिरासाठी वैद्यकीय महाविद्यालय येथून 25- डॉक्टर्स ,नर्सिंग स्टाफ, फार्मासिस्ट,सेवक कर्मचारी,एम एस डब्ल्यू,वाहन चालक असे एकूण 63 कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी या सर्व स्टाफचा गुलाब पुष्प व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.
या सर्व रोग निदान शिबिराचे नियोजन विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर, पर्यवेक्षक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी यशस्वीरित्या संपन्न केले.

पत्रकार -

Translate »