नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने तीन छाव्यांना दिला जन्म ! 

(कृषिन्युज PIB ): केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाजमाध्यमांवर शेयर केलेल्या संदेशात म्हटले आहे की, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की  कुनो राष्ट्रीय उद्यानात तीन नवीन छाव्यांचे आगमन झाले आहे. ‘आशा’ या नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने या गोड छाव्यांना जन्म दिला आहे”

केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की भारतात वन्यजीव आणि पर्यावरण समतोल निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट चित्ता या प्रकल्पाला मिळालेले हे घवघवीत यश आहे.

या प्रकल्पात सहभागी असलेले सर्व तज्ञ, कुनो वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी आणि देशभरातील वन्यजीव प्रेमी यांचे केंद्रीय मंत्री यादव यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार -

Translate »