पाथरशेंबे (चांदवड) : श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबेचा उत्कृष्ट निकाल!

कृषी न्यूज (कैलास सोनवणे) पाथरशेंबे, ता. चांदवड, जि. नाशिक: श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे यांच्या विद्यार्थ्यांनी २०२४ च्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. विद्यालयाचा निकाल ९५.४५% इतका गौरवर्ण्य लागला आहे.

या परीक्षेत प्रथम क्रमांक कु. ऋतिका बाळासाहेब मोरे यांनी ८०.००% गुण मिळवून ताबा मिळवला आहे. द्वितीय क्रमांक कु. श्रावणी भाऊसाहेब ठाकरे यांनी ८१.६०% गुण मिळवून पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक कु. क्षितिजा भाऊसाहेब अहिरे यांनी ८०.६०% गुण मिळवून जिंकला आहे.

विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत योगेश्वर विकास संस्था पाथरशेंबे चे अध्यक्ष श्री. किसनराव साठे, सेक्रेटरी श्री. रज्जाक कादरी आणि संचालक मंडळ तसेच श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर, शिक्षक श्री. वाघ सर, श्री. कदम सर, श्री. आवारे सर आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. मोरे भाऊसाहेब, श्री. शंकरभाऊ महाले आणि श्रीमती. सुरेखा गांगुर्डे यांनी पुढीलप्रमाणे शुभेच्छा संदेश दिला आहे:

“विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा उत्तम परिणाम म्हणून हा यशस्वी निकाल प्राप्त झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन! या यशाचा विद्यार्थ्यांना पुढील जीवनात शुभेच्छा.”

पत्रकार -

Translate »