राज्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा

राज्यातील पर्जन्यमानाचा अहवाल मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे प्रसिद्ध केला गेला आहे.

दि.२४.०७.२०२४ रोजी झालेला पाऊस व धरणातील विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा:

१. दिनांक २४.०७.२०२४ रोजी प्राप्त हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रात्री ११.४६ वाजता रेड अलर्ट सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२. पुणे येथे उद्भवलेली पूर परिस्थिती लक्षात घेता पूरा मुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी NDRF टीमला पाठिवण्यात आले असून आवश्यकता भासल्यास ARMY ला पाचारण करण्यात येईल. त्यानुसार ARMY चे मेजर जनरल श्री. अनुराग वीज यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक तेथे त्वरीत बोटी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

३. श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता महावितरण यांना आवश्यकतेनुसार वीज पुरवठा बंद करण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

४. विभागीय आयुक्त, पुणे यांना जिल्ह्याच्या जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात उपस्थित राहून आढावा घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

५. पुणे जवळील लवासा व ताम्हिनी येथे दरड कोसळल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना आवश्यक सुविधा भोजन व निवास याबाबतची व्यवस्था करण्याच्या सुचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

६. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्याबाबतचे निर्देश मा. उपमुख्यमंत्री तथा मा. मंत्री वित्त यांनी दिल्या आहेत.

७ धरणाचा साठा ७५ टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे सदर धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये होवू शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये NDRF आवश्यक साहित्यासह तैनात करण्यात आले आहे.

८. राज्यातील पूर्व अनुभव विचारात घेवून राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याकरीता बचाव कार्यासाठी SDRF व NDRF च्या टिम पूर्व तैनात करण्यात आल्या आहेत.

९. राज्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मा. मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री/मा. मंत्री (आपत्ती व्यवस्थापन) राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वारंवार आढावा घेण्यात असून त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जलसंपदा विभाग, ऊर्जा विभाग इ. विभागाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आवश्यक त्या सुचना दिलेल्या आहेत.

राज्यातील पावसाची स्थिती
खडकवासला धरण

🔺महाराष्ट्र राज्यातील पर्जन्य व त्यासंदर्भातील माहितीचा अहवाल हा  अहवाल मंत्रालय नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे

दि.24.07.2024 रोजी सकाळी 8 ते दि.25.07.2024 रोजी सकाळी 8 पर्यंत भारतीय हवामान विभागाकडून काल दि. 24/07/2024 रोजी राज्यातील (पालघर, रायगड, पुणे, सातारा) या (04) जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला होता.

आज दि 25.07.2024 रोजी पुढील 3 तासात राज्यातील ठाणे, रायगड, सातारा, पुणे, मुंबई, मुंबई शहर या 6 जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड (नावे) या 7 जिलग्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

गेल्या 24 तासात मुंबई आणि मुंबई उपनगर वगळून राज्याचे सरासरी पर्जन्यमान 33.7 मिमि. आहे.

या व्यतिरिक्त मुंबई व मुंबई उपनगर येथे अनुक्रमे 62.5 मिमि व 86.1 मिमि. पाऊस झाला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 01 जून, २०२४ पासून दि. 25/07/2024 पर्यंत 619 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. दि.15 में, 2024 ते आज दि. 25/07/2024 या कालावधीत 97 लोक मृत पावले असून 132 लोक जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 24 तासात 4 व्यक्ती मृत पावले असून 01 व्यक्ती जखमी झाले आहेत.

• पुण्यामध्ये नदीपात्रात वाढ झाल्याने अंडा भूर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून 3 व्यक्ती मृत्युमुखी

• मौजे आदरवाडी, तालुका मुळशी येथे 1 व्यक्ती दरड कोसल्यामुळे मृत्युमुखी.

• लवासा येथे एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोणीही अडकल्या असल्याची माहिती अद्याप अप्राप्त. शोध बचावासाठी पाठक रवाना करण्यात आले आहेत.

• सुरक्षित स्थळी स्थलांतरी केलेल्या नागरिकांची सांख्या / तपशील (जिल्हा):- पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सखल भागत पाणी साचल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

• जल संपदा विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या अहवालानुसार राज्यातील सर्व धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा 52.1% इतका आहे. कुंडलिका (रायगड), आंबा (रायगड), सावित्री (रायगड), जगबुडी (रत्नागिरी) नद्यांची धोका पातळीच्या वर वाहत आहे. पाताळगंगा (रायगड) व पंचगंगा (कोल्हापूर) इशारा पातळी वर वाहत आहे.

पत्रकार -

Translate »