चांदवड: दहिवदला सप्ताहाची सांगता..

दहिवदला सप्ताहाची सांगता

कैलास सोनवणे दिघवद वार्ताहर:

दहिवद येथे सालाबादप्रमाणे हभप मधुकर आपा आणि वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज सकाळी झाली. या सप्ताहात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी सामुदायिक हरीपाठ, आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गावाच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील झाला.

रात्री हरिभक्त परायण कल्याणी ताई निकम, सुखदेव महाराज बिन्नर, नंदकिशोर महाराज देवकर, संदीप महाराज जाधव, शाम महाराज गांगुर्डे, शुभम महाराज पानगव्हाणेकर, आणि सोमनाथ महाराज तांदळे यांच्या कीर्तनाने भक्तगणांना भक्ति रसात न्हालवले.

आज सकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी नंतर ह भ प समाधान महाराज पगार यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाटे, कोलटेक, दिघवद, दरसवाडी, काझी सांगवी, बापाने वाळकेवाडी, नारायण खेडे, रेडगाव आणि चांदवड तालुक्यातील भजनी मंडळांनी व दहिवद येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

पत्रकार -

Translate »