Nashik News : धनगर समाजाचा रस्ता रोको; आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)  : सकल धनगर समाजाकडून अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता नाशिक रोड येथे रस्ता रोको –
काल  सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी दत्त  मंदिर,नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर समाजाने अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता भव्य असे रस्ता रोको आंदोलन केले.यामुळे पूणे मार्गावरील वाहतूक बऱ्याच  कालावधी करीता विस्कळित झाली होती.

धनगर समाज प्रतिनिधी श्री.समाधान बागल यांच्या सोबत ‌चर्चा केली असतांना धनगर समाज हा मुळातच आदिवासी यादी मध्ये ३६ क्रमांकावर असून फक्त उच्चारणात  व लिहिण्यात बरोडाचे बडोदा व्हावे असे धनगरांचे धनगड झाले आहे.शासनाला ही चुक दुरुस्ती करून फक्त आदेश काढायचा आहे.


सदर आरक्षण अंमलबजावणी मुळे मुळ आदिवासी आरक्षणावर कुठलाही परीणाम होणार नसल्याचे धनगर समाजाचे म्हणने आहे . नासिक पुणे राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरून वाहतूक विस्कळीत झाली.याप्रसंगी महसूल विभाग पोलीस अधिकारी पोलीस फाटा तैनात  होता. याप्रसंगी  सामाजिकक्षेत्रातील श्री समाधान बागल, श्री विनायक काळदाते, ज्ञानेश्वर ढेपले, श्री नवनाथ ढगे, सदाशिव वाघ साहेब, किशोर वाघ, नितीन धाना पुणे  राजाभाऊ पोथरे, सोमनाथ गायकवाड,कल्पेश शिंदे वैभव रोकडे, अण्णा साहेब सापणार देवराम रोकडे, राजाभाऊ बादाड, भूषण जाधव, भाऊलाल तांबडे खंडेराव पाटील बापूसाहेब शिंदे,,रामेश्वर खानपाटे,सदर आंदोलनात ‌असंख्य धनगर समाज बांधव सामील झाले होते .

पत्रकार -

Translate »